– काकड आरतीची रामधुन व प्रभातफेरी सात दिवस राहणार
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी (नरेश ढोरे), २ नोव्हेंबर : नगराला लागूनच असलेल्या पालोरा या छोट्याशा गावात.धार्मिक व सामाजिक परंपरा अजूनही कायम राखत कोजागिरीपौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत काकडआरतीची परंपरा ५१ वर्षें पुर्ण करुन यंदा ५२ व्या वर्षीही मोठ्या उत्साहाने चालू आहे. आज २ नोव्हेंबर पासून सात दिवस रामधून व प्रभातफेरी ला सुरुवात झाली असून यामध्ये गावातील सर्व लहान- मोठे आबालवृद्ध महीला – पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
या एक महीनाभर चालणाऱ्या काकड आरतीला पहाटे पाच वाजता आंघोळ करून गावातील हनुमान मंदीरात पुजा अर्चा करून एक ते दीड तास भुपाळीचे पठण केले जाते नंतर आरती व श्लोक म्हणुन काकड आरती ची सांगता होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेवटचे सात दिवस रामधून व प्रभातफेरी काढुण कार्तिक पौर्णिमेला ८ नोव्हेंबरला म्हणजे शेवटच्या दिवशी पहाटे पाच वाजता स्थानिक गाढवी नदीवर गंगास्नान करून काकड आरती ची समाप्ती व दीवसा दुपारी तीन- चार वाजता गोपालकाला नंतर गाववासीयांकडुन सामुहिक जेवणाची व्यवस्था करण्यात आली असुन रात्री मनोरंजनासाठी स्थानिक कलाकारांची नाटक आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या दिवशी गावातील नातेवाईक आणि मानवाहीक पाहुणे यांना निमंत्रित केले जाते व या माध्यमातून सामाजिक एकोपा निर्माण होत असून सोयरसबंध जुळून येतात .या दीवशी गावातील सर्व लहान मोठे महीला व पुरुष मोठ्या उत्साहाने एकोप्याने सहभागी होऊन कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत करतात हे विशेष.