– धावले तरुण तरुणी व शेंकडों वयस्क
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी ( नरेश ढोरे) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आरमोरी तालूका क्रीडा संकुल व हितकारीणी विद्यालय आरमोरी यांच्या सौजन्याने काल ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शेकडो युवक- यूवती व वयस्कर सहभागी झाले.
या दौड चे अध्यक्ष नरेंद्र कोकुर्डे गटशिक्षणाधिकारी यांनी एकत्र या कार्यक्रमाला हीरवी झेंडी दाखवुन सुरुवात केली असता यांमध्ये शेकडो युवक- युवती व वयस्क धावले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सत्यनारायण चकिनारपवार, शंकर बोरकर माजी केंद्रप्रमुख, चरण चापले, प्राचार्य अद्दलवार, पाचपांडे , छगन सपाटे वनरक्षक, अरविंद रोकडे, दुर्वास बुध्दे, बालकास कोटरंगेगुरुजी, विजय गोंधोळे हे होते.
या एकता दौडचे संचालण ज्ञानबोणवार यांनी केले व मनोज मने यांनी आभार मानले. कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीने महत्वाचा घटक म्हणून आयोजित करण्यात आला होता.