The गडविश्व
ता. प्र / नरेश ढोरे (आरमोरी) : तालुक्यातील शंकरनगर येथे कालीमाता ऊत्सवास काल सोमवार २४ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली असून घटस्थापना करण्यात आली आहे. आज मंगळवार २५ ऑक्टोबर पासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेचे उद्घाटन सरपंच संघटनेचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संदिप भाऊ ठाकुर यांनी केले व अध्यक्षस्थानी शेख वनरक्षक व सह उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील नंदनवार, प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदेव जंगल कामगार सोसायटी चे अध्यक्ष दिलीप घोडाम, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र तिजारे, दिनेश वनमाळी, नारायण सरकार, सुबोध सरकार, सुरजीत मिस्त्री, उपस्थित होते.
कोणत्याही खेळात खेळतांना खेळाडुंनी मानसीक द्वेष मनात ठेऊन खेळु नये खेळाच्या मैदानात खेळभावनेनेच खेळावे असे आव्हान केले. दहा दिवस चालनाऱ्या काली माता उत्सवात मनोरंजनात्मक विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहेत तरी.जनतेनी शंकरनगर येथे एकदा तरी अवश्य भेट द्यावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष यांनी केले आहे.