– पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावर यांची माहिती
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील आलापल्ली सिरोंचा महामार्गाची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. सदर महामार्गाच्या कामाच्या डागडूजीच्या नावे करोडोंचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत अनेक निवेदणे, तक्रारी प्रशासनाकडे करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने सामाजिक कार्यकर्ता तसेच भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोेंडावर यांनी सदर महामार्ग संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत ताटिकोंडावर यांनी सांगितले की, आलापल्ली-सिरोंचा महामार्ग संदर्भात प्रशासनाकडे अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार शासनाने सदर रस्त्याच्या बांधकामाकरिता कोटयवधी निधी मंजुर केला पंरतु त्याचा सदउपयोग न करता या कामात कोटयवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपीही त्यांनी यावेळी केला. सदर 100 किमी महामार्गाच्या बांधकामाच्या दुरूस्तीकरिता 2017 ते 2021 या कालावधीत अंदाजे 105 कोटी रूपये एवढा खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र सदर महामार्गाचे काम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून एवढा निधी खर्च करून केलेला रस्ताच चोरीला गेला की काय असे म्हणयची वेळ आली आहे. तसेच संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी याकरिता चक्काजाम आंदोलन करून तक्रारी करण्यात आल्या मात्र प्रशासनातर्फे अदयाप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालायच्या नागपूर खंडपिठात सदर महामार्गासंदर्भात आपण जनहित याचीका दाखल केली असून सदर याचिका सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट शासन, जिल्हाधिकारी गडचिरोली, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग मुंबई, अधिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली, सहायक अभियंता आलापल्ली सब डिवीजन व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक यांच्याविरूध्द असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटिकोंडावार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ता तथा भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हाध्यक्ष सतीश ताटीकोंडावार तसेच जिल्हा संघटक अरुण शेडमाके उपस्थित होते.