The गडविश्व
अहेरी, २० सप्टेंबर : येथील लेआऊट मध्ये रस्त्याचे काम करण्यात येत नव्हते यामुळे आविसच्या वतीने उपोषण करण्यात आले होते. आता या उपोषणाला यश मिळाल्याचे दिसत असून भविष्याच्या उपोषणाच्या दणक्याने लेआऊट मधील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
उपोषणादरम्यान आंदोलनकाला दिलेल्या आश्वासनामुळे व ५ तारखेला निघालेल्या चौकशी च्या आदेशामुळे लेआऊट धारक आपआपल्या लेआऊट मध्ये रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र त्या रस्त्यासाठी वापरण्यात येणारी मुरूम वैद्य की अवैध याची तसेच सार्वजानिक बांधकाम विभाामार्फत देण्यात आलेल्या प्रमानका प्रमाणे रस्ते व नाली चे बांधकाम होत आहे का याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी लेखी तक्रार उपोषण कर्त स्विकृत नगर सेवक प्रशांत गोडशेलवार यांनी तहसिलदार अहेरी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.