आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन

121

-व्हिडीओ व्हॅनद्वारे जागृती
The गडविश्व
गडचिरोल, १६ एप्रिल : कोरची येथील शासकीय आश्रमशाळेत मुक्तिपथतर्फे व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत खर्राच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उच्चश्रेणी मुख्याध्यापक ढोक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खर्रा खाणे ही मानसिक बिमारी, मानसिक विकृती आहे. खर्राचे सेवन केल्याशिवाय डोक चालत नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, कामात मन लागण्यासाठी सुदृश शरीर, व्यायाम व अभ्यास करण्याची गरज आहे. खर्रा खाणारा माणूस कामावर मन लागत नाही, म्हणुन वारंवार खर्रा खातो हि त्यांची विकृती आहे. आपल्या शाळेत दंत तपासणीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. सध्यातरी शाळेत कोन्ही खर्रा खातांना आढळले नाही, जर दिसले तर कोटपा कायदा २००३ च्या अधिनियमाखाली २०० रुपयांची पावती फाडण्यात येते. कुणीही खर्रा आणण्यासाठी पाठविल्यास त्याला विद्यार्थ्यांनी नकार द्यावा. यमराजाचा फास हा चित्रपट मुलांना खूप काही शिकवतो. तंबाखूविरोधी जागृती करून मरणाच्या दारातुन वाचविण्याचे काम मुक्तीपथ अभियान करत आहे. आता तुम्हाला कस जगायच आहे हे तुम्हीच ठरवु शकता. निरोगी राहणे, चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो. असे मार्गदर्शन त्यांनी केले. मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत खर्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी राकेश जाधव यांच्यासह शालेय शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (PSG vs Lens) (News today) (Ashraf Ahmed) ( Breaking News) (Femina Miss India 2023) (Atiq Ahmed)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here