– आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रामुळे मुंबई येथील हिंदुजा रूग्णालयात झाली सलोनीवर ७ लक्ष रुपयांची मोफत शस्त्रक्रिया
The गडविश्व
गडचिरोली : ते म्हणतात ना “देव तारी त्याला कोण मारी”. असेच काहीस घडले गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील एका खेडे गावातील १३ वर्षीय सलोनी साईनाथ बुरांडे हिच्यासोबत.
चामोर्शी तालुक्यातील कुंभारवाही येथील रहिवासी साईनाथ बुरांडे यांच्या मुलीला तिन महिण्या अगोदर मेंदूचा पॅरस्सीगटिल पोस्टरीअर नावाचा दुर्धर आजाराने ग्रासले होते . साईनाथ हे वनमजुरी करून आपले कुटुंब कसे बसे चालवत असताना त्यांची मुलगी सलोनी(१३) ही मेंदू संबंधित Parassigatil posteriar या आजाराने ग्रासली. मुलीच्या उपचारासाठी चंद्रपूर , नागपूर , मुंबई , सावंगी मेघे असा प्रवास केला मात्र कुठेच मोफत इलाज होणार नाही असे लक्षात आले . आजार मोठा त्यात घरची परिस्थिती हलाखीची. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया हाच एकमेव इलाज सांगितला आणि तो ही खर्चिक, अनेकांसमोर हात पसरले पण कुठेच मदत मिळाली नाही .
आ.सुधीर मुनगंटीवार हे रुग्णांना मदत करतात एवढंच काय तर अनेक रुग्णांवर मुबंई सारख्या शहरात मोफत इलाज करून देतात हे साईनाथ बुरांडे यांना मित्रांनी सांगितले, साईनाथ यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या परिचयातील चंद्रपूर येथील माजी पंचायत समिति सभापती चंद्रकांत धोंडरे यांची भेट घेत आ.सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्याची इच्छा दर्शवली. २६ डिसेंबर ला चंद्रपूर येथील कार्यालयात आ.सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून साईनाथ यांनी त्यांच्या मुलीच्या प्रकृती बद्दल सर्व घटनाक्रम कथन करीत मदतीची मागणी केली .
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता थकलेल्या त्या बापाला आधार देत वैद्यकीय सहायक सागर खडसे यांना मदत करण्यास सांगितले त्यावरून मुंबई येथील पंचतारांकित हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ४ जानेवारी रोजी डॉक्टरांची भेट घेवून सलोनी वर उपचाराला सुरवात झाली . डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे सलोनीच्या मेंदुची शस्त्रक्रियेचा खर्च ७ लक्ष रुपये येणार होता . त्याकरिता धर्मदाय योजनेतून गरीबरूग्ण निधी मंजूर करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र पाठवले . पत्राची दखल घेत तात्काळ ७ लक्ष रुपये मंजूर झाले आणि १९ जानेवारीला सलोनी वर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
आमदार मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सलोनी साईनाथ बुरांडेचा जीव वाचला त्याबद्दल बुरांडे कुटुंबाने आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे .