इंधन दरवाढ विरोधात ‘आप’ चे भोंगा आंदोलन

129

The गडविश्व
गडचिरोली : आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने काल २१ एप्रिल रोजी शहरामध्ये इंधन दरवाढी विरोधात भोंगा आंदोलन करण्यात आले.
दिवसेंदिवस इंधनाच्या दरांमध्ये वाढ होत आहे. पेट्रोल, डीझेलव घरगुती वापरासाठी लागनारा स्वयंपाक गॅसच्या किंमतीचे दर गगनाला भिडत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट दिवसेंदिवस बिघडत आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढले अशातच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रस्थापित सरकारने जनतेला खोटे आश्वासन देऊन सत्ता हस्तगत केली परंतु जनतेच्या सोडवून आश्वासन विसरून गेले. प्रस्थापित सरकारला जाग आणण्यासाठी आम आदमी पार्टीने भोंगा आंदोलन उभे केले आहे. गोर, गरीब जनतेला मोफत गॅस देण्यात आले त्यानंतर त्याची सबसिडीही बंद केली , सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली, गोडे तेलाच्या किमती वाढल्या, गहू, तांदूळ, साखर, दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग झाल्या, वीजदर वाढले, घराचा कर वाढला या महागाईच्या कचाट्यातून सूटका करण्यासाठी आम आदमी पार्टी ने आंदोलन छेडले आहे. त्या आंदोलनाला जनतेचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे, महामंत्री भास्कर इंगळे, सहसयोजक रुपेश सावसाकडे, कोषाध्यक्ष संजय जीवतोड, ॲंड.हेमराज मेश्राम, हितेंद्र गेडाम, मिडीया प्रमुख नामदेव कोल्हे, किशोर आत्राम, एकनाथ गजबे, कल्पना गजबे, सावन सावसाकडे, रामचन्द्र सायलवार, गौतम गेडाम, समीता गेडाम, गनेश त्रिमूखे, सोनल नन्नावरे, चंद्रमनी रामटेके, कविता कुमरे, भैय्याजी महाजन, विष्णुदास कुमरे, प्रशिका पेटकर, शिल्पा पेटकर, वर्षा मेश्राम, सुकेशनी रामटेके आदी उपस्थित होते.शहरातील मुख्य मार्गावरून भोंगा वाजवत महागाई विरोधात निदर्शने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here