इच्छुकांच्या विरोधानंतर रेल्वेने NTPC, लेव्हल 1 च्या परीक्षा स्थगित केल्या

239

– उमेदवारांच्या चिंता आणि शंकांचे निरसन करण्यासाठी रेल्वेने स्थापन केली उच्चाधिकार समिती 
The गडविश्व
नवी दिल्ली : रेल्वे भरती मंडळाने 14-15 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) च्या (केंद्रीय रोजगार अधिसूचना CEN 01/2019 ) पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (CBT) च्या निकालासंदर्भात उमेदवारांनी उपस्थित केलेल्या चिंता आणि शंकांचे निरसन करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करत NTPC लेव्हल 1 च्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. 14 जानेवारी रोजी लागलेल्या आरआऱबी एनटीपीसीच्या निकालानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. रेल्वे, आरआरबी आणि एनटीपीसीच्या निकालात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच विद्यार्थ्यांमधील CB-2 काढून टाकण्याची मागणी केली.
आरआरबी एनटीपीसी(NTPC) निकालाबाबत बिहारमधील विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने NTPC आणि लेव्हल 1 च्या परीक्षेवर बंदी घातली आहे. तसेच एक पत्रका जारी करत रेल्वे रूळांवर आंदोलन करणाऱ्यांना नोकरी देण्यात येणार नाही. असे स्पष्ट केले आहे.
ही समिती उमेदवारांनी उपस्थित केलेले CEN 01/2019 (एनटीपीसी ) च्या पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (CBT) चे निकाल आणि निवडलेल्या उमेदवारांना प्रभावित न करता विद्यमान यादीतील दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी -CBT साठी उमेदवार निवडण्यासाठी वापरलेली पद्धत, CEN RRC 01/2019 मध्ये दुसऱ्या टप्प्यातील सीबीटीचा समावेश हे मुद्दे विचारात घेऊन शिफारशी करणार आहे.
रेल्वे भरती मंडळाच्या सर्व अध्यक्षांना त्यांच्या विद्यमान स्रोतांकडून उमेदवारांच्या तक्रारी प्राप्त करण्याचे आणि त्या संकलित करून समितीकडे पाठवण्याचे .निर्देश देण्यात आले आहेत.
उमेदवारांना त्यांच्या शंका आणि सूचना सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा म्हणजेच 16.02.2022 पर्यंत वेळ देण्यात आला आहे आणि या चिंता जाणून घेतल्यानंतर समिती 4.03.2022 पर्यंत त्यांच्या शिफारसी सादर करणार आहे.
या पार्श्वभूमीवर CEN 01/2019 (NTPC) ची 15 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु होणारी दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (सीबीटी ) आणि CEN RRC 01/2019 ची 23 फेब्रुवारी रोजी सुरु होणारी पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (सीबीटी ) पुढे ढकलण्यात आली आहे.
उमेदवार त्यांच्या शंका आणि सूचना समितीकडे rrbcommittee@railnet.gov.in या ईमेल आयडीवर नोंदवू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here