इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू

287

– आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू

The गडविश्व
मुंबई : ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान, पावणे आठच्या सुमारास ही आग लेव्हल 3 ची असल्याची अग्निशमन दलाकडून घोषणा करण्यात आली. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सूरु असल्याची माहितीआहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here