– राम गणेश गडकरी साखर कारखाना व्यवहार प्रकरण
The गडविश्व
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यापाठोपाठ आता राम गणेश गडकरी साखर कारखाना व्यवहार प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीने 13 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. जवळपास प्राजक्त तनपुरे यांची 10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने कारवाई करत मंत्री प्राजक्त तनपुरे यांची १३ कोटी ४१ लाखांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे.