ई-पिक ऑनलाईन नोंदणी करीता ३० ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्या : आमदार कृष्णा गजबे

361

– जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातुन मागणी
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, ४ ऑक्टोबर : शासकीय धान खरेदी केन्द्रावर धान विक्रीसाठी ई-पिक नोंदणी सक्तीची करण्यात आली असुन १५ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागात नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाईन ई-पिक नोंदणी शक्य नसल्याने शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीपासुन मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता ३० ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात ऐवी अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकारी संजय मिना यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
धान खरेदी हंगाम सन २०२२‌-२३ करीता शेतकऱ्यांकडुन आधारभूत धान खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे.त्या करीता चालु वर्षाचा ई-पिक नोंदणी केलेला सात बारा आवश्यक करण्यात आला असुन सदर नोंदणी करीता १५ ऑक्टोबर २०२२ ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, डोंगराळ भागात वसलेला असुन जिल्ह्यात पुरेशी इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना वेळेत ई-पिक नोंदणी करता आली नाही. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनी द्वारे शासनाने जारी केलेल्या नविन ॲपवर नोंदणी केली असता आठ ते दहा दिवसाचा कालावधी लोटला असताना अद्यापही सातबारा नोंद झाली नाही. यामुळे ऑनलाईन नोंदणी करीता अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांकडुन खरेदीसाठी नोंदणी करताना सन २०२१-२२ चा सातबारा स्विकारून ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत ई-पिक पाहणी अधिकृत नोंद झालेला सातबारा सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी आमदार गजबे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here