– सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, १० ऑक्टोबर : आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०२२ चे आयोजन विद्यार्थी विकास विभाग , गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उद्या ११ ऑक्टोबर ला सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, गायक व प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर, प्रमुख अतिथी म्हणून प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन , आयोजक डॉ.शैलेन्द्र देव , संचालक(प्र.) विद्यार्थी विकास विभाग राहणार आहेत.
हा महोत्सव ११ ते १३ ऑक्टोबर असा तीन दिवसीय चालणार आहे . या सांस्कृतिक महोत्सवाला उद्या ११ ऑक्टोबरला सकाळी १०. ३० वाजता सुरुवात होणार असून यात शास्त्रीय नृत्य , लोकनृत्य, मूकनाट्य, नकला , १२ ऑक्टोबरला शास्त्रीय संगीत, सुगम संगीत ,समूहगीत, शास्त्रीय तालवाद्य , संगीत शास्त्रीय ताण वाद्य ,पाश्चिमात्य गायन , लोकसंगीत वाद्यवृंद, वादविवाद स्पर्धा , वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा , १३ ऑक्टोबर ला रांगोळी , स्थळ छायाचित्रण , स्थळ चित्र , पोस्टर मेकिंग , व्यंगचित्र , माती कला, चिकट कला, एकांकिका , प्रहसन या स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयाचे जवळपास ७०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या इंद्रधनुष्य महोत्सवाचा समारोप १३ ऑक्टोबरला होणार आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन आणि या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. शैलेंद्र देव यांनी केले यांनी केले आहे.