उद्या चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात ‘सिकल सेल ओपीडी’

145

The गडविश्व
गडचिरोली, १७ जानेवारी : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित सर्च रुग्णालयात उद्या १८ जानेवारी २०२२ ला ‘सिकल सेल ओपीडी’ घेण्यात येणार असून डॉ. कल्पिता गावीत व त्यांची टिम या ओपीडीसाठी उपस्थित राहणार आहेत. तरी सिकल सेल विकाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सिकल सेल आजार हा अनुवांशिक आजार आहे. यात आई व वडील दोघे ही सिकलसेल रुग्ण किवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्याना हा आजार होऊ शकतो. सिकलसेल आजारचे दोन प्रकार असतात रुग्ण व वाहक. रुग्ण व्यक्तिला नेहमी जंतुसंसर्ग व त्रास होतो. वाहक व्यक्तिला सिकलसेल आजारचा त्रास कमी होतो. पण तो पुढील पिढीस सिकलसेल आजार देऊ शकतो. आजाराची माहिती, लक्षणे व रुग्णांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन तसेच तपासणी व उपचार या ओपिडी मध्ये केल्या जाईल. काळाची गरज समजून आणि रुग्णांमधील गुंतागुंतीच्या वाढत्या प्रवृत्तीचा विचार करून ‘सर्च’ हॉस्पिटलमध्ये ‘आयसीएमआर सिकलसेल टिम चंद्रपुर व सर्च यांच्या सहकार्याने नियमित ‘सिकल सेल ओपीडी’ सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ही ओपीडी असेल. १८ जानेवारी या दिवशी होणाऱ्या ओपीडिला डॉ. कल्पिता गावीत व त्यांची टिम उपस्थित राहणार आहेत. सिकल सेल रोगाचे निदान करण्यासाठी तपासणी केल्या जाईल ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता याची माहिती तज्ञांना मिळेल. तरी सिकल सेल विकाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा तसेच गैरसोय होऊ नये म्हणून हॉस्पिटल मध्ये पूर्व नोंदणी करावी. असे आवाहन ‘सर्च’कडून करण्यात येत आहे.
(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (JEE Main 2023 Admit Card) (PSG) (Australian Open) (The Last of Us TV series) (OpenAI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here