उद्या जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन

164

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद २०२३ यांनी सुचविलेल्या सुधारणांचे अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यात येत आहे. त्याच धर्तीवर निर्यात व विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करून आर्थिक विकासासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे योगदान महत्वाचे ठरते. तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्र २०२४ ची पूर्वतयारी म्हणून सुद्धा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन हे महत्वपूर्ण ठरते. उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी गडचिरोली येथे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन गुरुवार, ७ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वा. हॉटेल लँडमार्क, चंद्रपूर रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी शासनाच्या या अभिनव उपक्रमात होतकरू व उत्सुक उद्योजक संघटना, औद्योगीक समूहातील उदयोग घटक व उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. जिल्याच्या विकासाला उद्योगातून चालना मिळावी, उद्योजकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी पुढाकार घेतला आहे, याबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्ह्याच्या विकासासाठी नवनवीन उद्योगाची गरज असते. त्यातून रोजगार निर्मिती होते. परंतु अनेकवेळा नव्या उद्योग उभारणीसाठी काही कारणास्तव विलंब होत असतो यासह अन्य काही अडचणीसह मार्गदर्शनाचा अभाव जाणवतो या सर्व बाबीवर चर्चा व्हावी आणि विकासाला चालना मिळावी म्हणून नवनवीन उद्योग, गुंतवणूक वाढवी आणि रोजगार निर्मिती व्हावी यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रामधील गुंतवणूक व व्यवसाय संधींबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, उद्योजकांचे अनुभव कथन इत्यादी बाबींचा समावेश आहे. दरम्यान जिल्हयातील होतकरू व उत्सुक उद्योजक संघटना, औद्योगीक समूहातील उद्योग घटक व इतर उद्योग व्यवसायाशी निगडित सर्व संस्थांनी उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या अडचणी व संधी इ. बाबीच्या माहित व चर्चेसाठी जिल्हा उद्योग केंद्र, MIDC रोड, गडचिरोली येथे संपर्क साधावा. असे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here