The गडविश्व
गडचिरोली : २०१९ ते जानेवारी २०२२ पर्यंत कोरोनचस संकट उभे होते त्यामुळे मुलांचे घराबाहेर निघणे, खेळणे बंद झाले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता पुन्हा क्रीडा क्षेत्रात गती मिळाली आहे. हे बघता उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरे घेतल्यास शहरातील क्रीडा सांस्कृतिला चालना मिळेल असे प्रतिपादन गडचिरोलीचे बॉक्सिंग प्रशिक्षक महेश निलेकार यांनी केले आहे.
कोरोना काळात मुलांच्या आरोग्याची काळजी घरातील व्यक्ती घेत होते, कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, शाळेचे वर्गही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत होते यामुळे मुलांच्या खेळातील कलागुणांना वाव देण्यामध्ये खंड पडला होता त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक तसेच क्रीडा प्रकारच्या बाबतीत प्रचंड नुकसान झाले. ऑनलाईन वर्गामुळे मोबाईलचा अधिक वापर वाढू लागला त्यामुळे मानसिक क्षमतेवर सुद्धा प्रचंड आघात झाला. या काळात मुलांच्या मानसिक ताण तणाव अधिक वाढला व आळशीपणा जाणवू लागला. अनेक समस्या मुलांसमोर उभ्या झाल्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला क्रीडा गुणांच्या विकासासाठी मूलभूत कार्यक्रम राबविने आवश्यक झाले आहे. वेगवेगळया स्तरावर शासनाने व सामाजिक संस्था दरवर्षी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे राबवित होते मात्र कोरोनामुळे सर्व स्तरावर खंड पडल्याने क्रीडा संकुले खेडाळूंची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुन्हा उन्हाळी प्रशिक्षण शिबीरे हे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवन ठरेल.
सन २०२२ या शैक्षणिक वर्ष दरम्यान सुरु होणाऱ्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सामाजिक संघटना खेल संघटना व शासनाच्या वतीने क्रीडा प्रशिक्षण शिबिरे आयोजित केले जात आहे. हे उपक्रम खेळाडूंच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता शारीरिक व मानसिक क्षमतेच्या विकासासह संघ स्वरूपाची बांधीलकी खेळात निर्माण होईल या हेतूने विविध खेळातील खेळाडूंना एकत्र येत शालेय उपक्रम राबवण्यात येत विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यामध्ये क्रीडा क्षेत्राविषयी अधिक आपुलकी निर्माण होण्यास मदत होईल. त्याच बरोबर गडचिरोली शहरातील क्रीडा संस्कृती अधिक प्रभावी व्हावी यासाठी पालकांचा क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला असल्यामुळे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे नव संजीवनी ठरेल. क्रीडा संस्कृतीला गतिशील अशी चालना मिळेल व उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामुळे मुलांमध्ये खेळाचे महत्त्व लक्षात येईल विद्यार्थ्यांना मैदानावर येण्याची आवड निर्माण होईल याचा सर्वात मोठा फायदा या क्रीडा शिबिरामुळे होत असतो त्याचबरोबर भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करणारे खेळाडू निर्माण होतील व गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक करतील.
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना खेळातील मूलभूत क्रीडा कौशल्याची ओळख करून देणं अतिशय महत्वाचे आहे
– यशवंत कुरुडकर, सचिव, गडचिरोली बॉक्सिंग संघटना
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामुळे मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यास मदत होईल व मानसिक ताणतणाव मुक्त राहतील.
– महेश निलेकार, बॉक्सिंग प्रशिक्षक, गडचिरोली