उन्हाळी धान शेतीमध्ये हिरवळीचे खत म्हणून ॲझोलाचा वापर करावा : डॉ. सुभाष पोटदुखे

109

The गडविश्व
गडचिरोली, १२ नोव्हेंबर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालय, नागपूर व कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांच्या मार्फत “अझोला तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण ” कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२ रोजी कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे करण्यात आले.
“अझोला तंत्रज्ञान एक दिवसीय प्रशिक्षण” कार्यक्रमास डॉ. सुभाष पोटदुखे, मुख्य अन्वेषक तथा वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर, संदिप कऱ्हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि प्राध्यापक, विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली, डॉ. दमयंती गुळदेकर, सहयोगी प्राध्यापक, डॉ. टि. एस. पिल्लई, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर, एन. पी. बुध्देवार, विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र), डॉ. पी. एन. चिरडे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), अंकुश गाटोळे, प्रविण आर. नामुर्ते, प्रकल्प सहाय्यक, ॲझोला तंत्रज्ञान तसेच जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

डॉ. सुभाष पोटदुखे, मुख्य अन्वेषक तथा प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर, ह्यांनी अझोला ही एक पाण्यावर तरंगणारी नेचे वर्गातील पाणवनस्पती आहे. ही वनस्पती अतिशय थोड्या अन्नावर उत्तम प्रकारे व झपाट्याने वाढणारी वनस्पती आहे. तसेच सेंद्रीय शेती करण्याच्या दृष्टीने उन्हाळी धान शेतीमध्ये हिरवळीचे खत म्हणून अझोल्याचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचे मार्गदर्शन केले.अझोला नत्र पुरविणारी वनस्पती आणि हिरवळीचे खत म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो. अझोल्यामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तो जमिनीत टाकल्याने लवकर कुजतो व त्या पासुन उत्तम प्रतिचे सेंद्रीय खत तयार होते त्यामुळे भात शेतीमध्ये नत्र स्थिरीकरणासाठी अझोला वनस्पती फायदेशीर आहे असे प्रतिपादन केले.

संदिप कन्हाळे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली ह्यांनी सेंद्रीय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो असे सांगितले. त्याचप्रमाणे दुधाळ गायींना पशुखाद्य म्हणून अझोलाचा वापर करणे सोयीस्कर आहे. तसेच धान उत्पादनाकरीता अझोलाचा वापर जमीनची पोत सुधारण्यास होते त्याकरीता शेतकऱ्यांनी अझोलाचा वापर करावे असे प्रतिपादन केले. डॉ. ‘दमयंती गुळदेकर, सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर ह्यांनी ॲझोला तंत्रज्ञान विषयी प्रस्तावना सादर केली. शास्त्रोक्त पध्दतीने अझोला उत्पादन वाढविण्याच्या पध्दती, धान शेतीमध्ये अझोल्याचा वापर करण्याची पध्दती, दुग्ध उत्पादनाकरीता ॲझोलाचे कार्य विषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. टि. एस. पिल्लई, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर ह्यांनी धान पिकांमध्ये ॲझोला तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले. अझोला वाढीसाठी पाण्याची गरज अत्यावश्यक असते म्हणून त्याचा धान पिकासाठी चांगला उपयोग होतो. अझोला धान पिकासाठी दोन पध्दतीने वापर करू शकतो.
पहिल्या पध्दतीमध्ये चिखलणीपुर्वी शेतामध्ये २० ते २५ दिवस अगोदर वाढविण्यात येते यासाठी पाणी साठवून त्या अझोला टाकण्यात येतो. या कालावधीमध्ये अझोलाची पुर्ण वाढ होते. चिखलणी करतेवेळी हा अझोला शेतामध्ये गाडण्यात येतो. अशा प्रकारे हेक्टरी १० टन अझोला वापरल्यास धान पिकास २५ ते ३० किलो नत्र प्रति हेक्टरी मिळतो.
दुसऱ्या पध्दतीमध्ये अझोला कृत्रिम डबक्यात किंवा तळ्यात वाढविण्यात येतो डबक्यामध्ये १० ते १५ सेंमी. खोली पर्यंत पाणी साठऊन ठेवावे त्यामध्ये हेक्टरी ८ किलो या प्रमाणात स्पूरद मिसळावे. डबक्याचा आकार १०० मि. वर्गा पेक्षा जास्त असु नये. या डबक्यात प्रति मि. वर्ग क्षेत्रासाठी ५० ग्राम अझोला टाकावे. साधारण २० ते २५ दिवसामध्ये हेक्टरी ८ ते १० टन अझोला तयार होतो. अझोला २० ते ३०° सेंटीग्रेड तापमानात जास्त वाढतो. अशा प्रकारे वाढविलेला अझोला शेती आणि जनावरांसाठी, मासे आणि बदक पालन करण्याकरीता वापर करू शकतो. धान पिक लागवडीनंतर ७ व्या दिवशी बांध्यामध्ये ५०० किलो प्रति हेक्टर प्रमाणात अझोला टाकावा व बांधित ५ ते ७.५ सें.मी. इतकी पाण्याची पातळी राखून ठेवावी. धान पिकास अझोला वापरल्याने २५ ते ३० किलो नत्र प्रति हेक्टरी मिळतो. शिवाय सेंद्रीय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. तसेच धानाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होते.
सदर अझोला तंत्रज्ञान एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दमयंती गुळदेकर ह्यांनी केले तसेच प्रविण आर. नामुर्ते, प्रकल्प सहाय्यक, ॲझोला तंत्रज्ञान यांनी सदर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनाकरीता परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here