The गडविश्व
गडचिरोली : उन्हाळी परीक्षा २०२२ च्या संदर्भात विद्यापीठ सभागृहात विद्यार्थी संघटनांची बैठक आज पार पडली. या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड.चिताडे तसेच विद्यार्थी संघटनेचे शक्ती केराम, जयेश ठाकरे, अभिषेक देवर , अंकुश कुनघाडकर आदींची उपस्थिती होती.
उन्हाळी परीक्षा ऑफलाईन मोडमध्ये घेण्याचे दोन्ही संघटनेच्या प्रतिनिधींकडून सुझाव देण्यात आले तसेच कोरोना संक्रमणाच्या परिस्थिती पूर्वी ज्या पद्धतीने परीक्षा होत होत्या, त्याच पद्धतीने त्या घेण्यात याव्यात. क्वलिटी एज्युकेशन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पदवीनंतर पुढे रोजगाराच्या दृष्टीकोनातून ही सकारात्मक चर्चा करण्यात आली .
या प्रसंगी बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईन किंवा ऑफलाईन घ्यायच्या या संदर्भात विद्या परिषदेमध्ये हा मुद्दा मांडण्यात येईल आणि त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. तसेच या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी रोजगारा संदर्भात रजिस्ट्रेशन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.