एकदिवसीय महिला विश्वचषक : भारतीय महिला संघाचा पाकिस्तानविरोधात दणदणीत विजय

427

The गडविश्व
नवी दिल्ली : एकदिवसीय महिला विश्वचषकासाठीच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानला तब्बल १०७ धावांच्या फरकाने पराभूत केले आहे. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. हे आव्हान गाठताना पाकिस्तानी संघाची चांगलीच दमछाक झाली. पाकिस्तानला अवघ्या १३७ धावा करता आल्या. भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरोधातील विजयाची मालिका सुरुच ठेवल्याने या धडाकेबाज कामगिरीचे कौतूक केले जात आहे.
भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे आव्हान उभे केले होते. पाकिस्तान संघाने आव्हानाचा पाठलाग करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र या संघाला फक्त १३७ धावाच करता आल्या. ४३ षटकांमध्ये पाकिस्तानचा पूर्ण संघ बाद झाला. पाकच्या एकाही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही. शिद्रा अमिनने ३० धावा केल्या. त्यानंतर एकाही खेळाडूने २४ पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. दहाव्या षटकात पाकचा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर ७० धावांवर असतानाच पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here