एकलव्य मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लागणार

245

– गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांना आदिवासी विकास विभाग गडचिरोली चे प्रकल्प अधिकारी घोष यांचे आश्वासन
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, ३० सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून एकत्मिक आदिवासी विकास विभाग गडचिरोली अंतर्गत शासनाने शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा गडचिरोली येथील इमारतीत एकलव्य मॉडल रेसिडेंटल स्कूल चामोर्शी व गेवर्धा येथील शाळेतील विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. मात्र, येथे इमारतीसह विविध समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. परंतु अजुन पर्यंत व प्रशासनाकडुन कोणत्याच समस्या सोडविल्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे गडचिरोली येथील एकलव्य मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या समस्यां तात्काळ सोडविण्यात यावे यासाठी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन गडचिरोली येथील एकलव्य आदिवासी मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या समस्यां सोडविण्यासाठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. निवेदनाची दखल घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी घोष यांनी सांगितले की शाळेला भेट देऊन उद्भवलेल्या समस्यावर काय उपायोजना करता येऊन यावर लवकरात लवकर मार्ग काढुन विद्यार्थ्यांना भोतिक सुविधा देण्यास प्रयत्न करू तसेच विद्यार्थ्यांसाठी ईमारतीचेही बांधकाम होणे गरजेचे असल्यामुळे प्रयत्नशील राहु असे आश्वासन दिले. त्यामुळे गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या प्रयत्नाला यश आल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक ऑल कमिशनर्स ट्रायबल डेव्हलपमेंट महाराष्ट्र स्टेट नाशिक अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेंट स्कूल चामोर्शी आणि गेवर्धा येथील शाळा सध्या शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा गडचिरोली येथे आहेत. सध्या गडचिरोली येथील प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तीन शाळांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात चामोर्शीतील १ ते ४ आणि ६ ते १० वर्ग आहेत तर गेवर्धा येथील ६ ते ९ वर्ग आहेत. दोन्ही शाळांचे अंदाजे ५५० विद्यार्थी तर इंग्रजी माध्यमांचे तेवढेच असे एकूण अंदाजे ११०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी तीन शाळा भरविणे योग्य आहे का ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील एकलव्य मॉडल रेसिडेंटल स्कूलच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिजे त्या प्रमाणात नाही, शिक्षणाचा दर्जा उंचावलेला नाही. विद्यार्थ्यांच्या वयानुसार शिक्षणाची प्रगती दिसून येत नाही. येथील मुलांना कोणतेही शिक्षण दिले जात नाही. वर्गखोल्या नसल्याने एक ते चारच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसविले जाते. शिकविण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता असतानाही येथे शिक्षक नाहीत, बसायला जागा नाही. विद्यार्थ्यांना एकत्र कोंबल्यासारखे ठेवले जाते. झोपायला बेड नाही. विद्यार्थी जमिनीवर झोपतात. पाण्याची सुविधा नाही, लहान मुले आंघोळ आणि शौचालय व बाथरुमसाठी वरती पायऱ्या चढून पाणी नेतात, पहिलेच कोरोनामुळे शालेय विद्याथ्यांचे दोन वर्ष शिक्षणाअभावी वाया गेले. आता दोन महिने उलटूनही शाळेतील विद्यार्थी एकाच वर्गात बसविले जाते. वर्गशिक्षक नाही, अभ्यासक्रम शिकवला जात नाही, गृहपाठ दिला जात नाही, एकंदरीत शाळेतील विद्यार्थ्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. इमारतीची व्यवस्था नसताना शाळा एकत्र ठेवल्याच कशा, यासधी विद्यार्थ्यांचे पालक विलास कुमोटी यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या कडे लेखी स्वरूपात समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी केली होती यावरून गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी दखल घेऊन गडचिरोली येथील एकलव्य मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या समस्यां तात्काळ सोडविण्यात यावे यासाठी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे चे प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन गडचिरोली येथील एकलव्य आदिवासी मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या समस्यां सोडविण्यासाठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावर सकारात्मक चर्चा होऊन निवेदनाची दखल घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी घोष यांनी सांगितले की शाळेला भेट देऊन उद्भवलेल्या समस्या वर काय उपायोजना करता येऊन यावर लवकरात लवकर माग काढुन विद्यार्थ्यांना भोतिक सुविधा देण्यास प्रयत्न करू तसेच विद्यार्थ्यांसाठी ईमारतीचेही बांधकाम होणे गरजेचे असल्यामुळे प्रयत्नशील राहु असे आश्वासन दिले. यामुळे आता गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या प्रयत्नाला यश आल्याचे दिसून येत आहे.
यावेळी आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे शिक्षणाधिकारी राठोड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here