The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) नियम २०१२ व त्यामध्ये शासनाने १८ जानेवारी २०१९ व २ ऑगस्ट २०१९ च्या आदेशानुसार सुधारित केलेल्या तरतुदीनुसार समावेश राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली या आस्थापनेवरील सहस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील ३१ डिसेंबर २०२० अखेर पर्यंत रिक्त असलेल्या १०५ पदाकरिता सशस्त्र पोलीस शिपाई भरती आयोजित करण्यात आली आहे. सदर भरतीकरिता रविवार २६ जून रोजी लेखी परीक्षा पार पडली. सदर लेखी परीक्षेची उत्तरतालिका https://www.maharashtrasrpf.gov.in/Recruitment संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.