THE गडविश्व
मुंबई : राज्यात काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. मात्र, एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावूनही कामावर रुजू न झालेल्यांना बडतर्फ करुन घरी पाठवले. आता त्यापुढचे मोठे पाऊल उचलत नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकार संप मिटवण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहे. मात्र कर्मचारी विलनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. अद्याप काही एसटी कर्मचारी संपावर आहेत. मात्र, यातच एसटी महामंडळाने नव्याने कर्मचाऱ्यांनी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने नवी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. एसटीच्या उर्वरित 55 हजार संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या 1144 असून एकूण निलंबित कर्मचारी संख्या 11024 इतकी आहे.
एसटी संप मिटत नसल्याने एसटीमध्ये सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. त्याबद्दल एसटी महामंडळाने जाहिरात काढली आहे. एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांनी जवळ पास दोन महिने संप पुकारला आहे. तर काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.