– धानोरा- रांगी -आरमोरी- ब्रम्हपुरी बस सुरु करण्याची मागणी
गडविश्व
ता.प्र/ धानोरा, ६ जुलै : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपामुळे गेल्या ८ ते १० महिण्यापासून बस करण्यात आल्या होत्या. काही प्रमाणात आता एस.टी बस सुरु झाल्या आहेत मात्र अद्यापही धानोरा, रांगी, मोहली, आरमोरी परिसरातील नागरिकांसह आरमोरी येथे शालेय शिक्षण घेत आसलेल्या विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी मोठी अडचन निमार्ण होत आहे. त्यामुळे धानोरा- रांगी -आरमोरी- ब्रम्हपुरी हि बस नियमित सुरु करावी अशी मागणी रांगी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसह नागरिकांकडून होत आहे.
सदर बस पूर्वी सकाळी ८.३० वाजता ब्रम्हपुरी येथून सुटायची. १०.०० वाजत रांगी येथे यायची व रांगी येथून याच बसने अनेक शालेय विद्यार्थी मोहलि व धानोरा येथे शिक्षण घेण्यासाठी जायचे . परत ४.३० वाजता यायचे मात्र बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वांरंवार मागणी करुनही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
धानोरा, मोहली, रांगी परिसरातील नागरिकांना या मार्गाने ये-जा करण्यासाठी कोणतेही साधन नाही. व प्रवासाची वाहन चालत नसल्याने नागरिकांची मोठी होरपळ होत आहे. गेल्या आठ महिन्यापासून ब्रह्मपुरी आगाराची एसटी बस सेवा बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संपापूर्वी ही बस ब्रह्मपुरी येथून सकाळी ८.३० वाजता सुटत होते दिवसभराच्या आपल्या नियमित दोन फेऱ्या करून सायंकाळी ब्रह्मपुरी आगारात पोहोचत होती. या बसमुळे आरमोरी, ब्रह्मपुरी, वैरागड, रंगी, धानोरा येथील नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी, रुग्ण आदींना धानोरा, आरमोरी, ब्रह्मपुरी तालुका मुख्यालय याठिकाणी जाण्याकरता अत्यंत सोयीचे होते परंतु सध्या बस बंदच असल्याने लोकांची, विद्यार्थ्यांची , कर्मचाऱ्यांची , व्यापारी व रुग्णांचे वाहना अभावी हाल होत आहेत. त्यामुळे सदर बस पूर्ववत सुरु करून विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होरपळ थांबवण्यात यावी अशी मागणी होत आहे.