– क्रिकेट विश्वावर शोककळा
The गडविश्व
मुंबई : शेन वॉर्ननंतर जगात आपल्या आगळ्या वेगळ्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्गज माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स यांचे कार अपघातात निधन झाले आहे. या घटनेने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघात झाला. या कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. क्वीन्सलँडच्या टाऊन्सविले इथे ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला अपघात झाला होता.
सायमंड्सच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
एकाच वर्षात दोन दिग्गज व्यक्तीमत्त्व गेल्याने क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाची आहे. या दुर्घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.