औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास राज्य सरकारची मान्यता

354

– ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय
The गडविश्व
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली. यात आज खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणजे औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता देण्यात आली आहे.
औरंगाबाद शहराचा नामकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. भाजप आणि मनसेकडून नामकरणाच्या मुद्द्यावरुन अनेकदा महाविकास आघाडी सरकारला घेरण्यात आले. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारने याबाबतचा आज निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या ५० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने औरंगाबाद नामकरणाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे फक्त औरंगाबादच नाही तर उस्मानाबाद शहराचे देखील धाराशीव नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. ठाकरे सरकारचे महाराष्ट्राच्या इतिहासातील हा सर्वात मोठे निर्णय मानले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here