The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २१ नोव्हेंबर : तालुक्यातीलल कटेझरी येथ १८ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पोलीस मदत केंद्र कटेझरी येथे भव्य जनजागरण मेळावा तसेच भगवान बिरसा मुंडा हाॅलीबाॅल स्पर्धा, राणी दूर्गावती हस्तकला स्पर्धा, आदीवासी रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले. तसेच जनजागरण मेळावा, भगवान बिरसा मुंडा व्हाँलिबाल स्पर्धा आयोजित करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्या संघाना प्रथम, व्दितीय, तृतीय पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
जनजागरण मेळाव्या दरम्यान नागरिकांना विविध वस्तू चे वाटप करण्यात आले तसेच सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
मेळावा पार पाडण्यासाठी प्रभारी अधिकारी बंडु साळवे, पोउपनि सुरेश जारवाल , पोउपनि प्रदीप साखरे , पोउपनि दिपक खरात, पोउपनि अंकुश पायघन, पोउपनि सुधाकर दरो तसेच जिल्हा पोलीस व एस. आर. पी. एफ. अंमलदार यांनी परिश्रम घेतले.