कढोली क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : खासदार अशोक नेते

164

– नाटय प्रयोगाच्या निमित्ताने कढोली गावातील विविध समस्या घेतल्या जाणुन
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील दुर्गा मातेचे दर्शन व नाट्य प्रयोगाच्या निमित्याने येथील शेतकरी, शेतमजूर, नागरिक, विद्यार्थी यांच्यासोबत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी थेट संवाद साधला व कढोली या गावातील समस्या जाणून घेतल्या. तसेच दुर्गा उत्सव मंडळाद्वारे आयोजित नाट्य प्रयोगाच्या निमित्याने उपस्थितांना मार्गदर्शन करतांना खासदार अशोक नेते यांनी गावातील प्रमुख समस्या -पिण्याच्या पाण्याची समस्या, विज, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, परिसरात वाघाची दहशत अशा विविध समस्या प्रामुख्याने सोडवण्यात येतील असे याप्रसंगी प्रतिपादन केले. तसेच प्रामुख्याने कढोली येथील समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रामुख्याने खा.अशोकजी नेते, आमदार कृष्णाजी गजबे, प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, तालुकाध्यक्ष वडसा राजू जेठानी, माजी जि.प.सदस्य भाग्यवानजी टेकाम, सरपंचाच्या बारीकाताई रंदये, उपसरपंच किरनजी आकरे, आनंदराव आकरे, तंटामुक्ती अध्यक्ष देवनाथजी निकोडे, कढोलीचे ग्रामविकास अधिकारी व ग्रा.प.सदस्य तसेच आदि अनेक पदाधिकारी व गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here