The गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कर्कापली येथील विक्रेत्यांचा जवळपास ४० हजारांचा मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कृती गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शनिवारी केली.
कर्कापल्ली गावात पूर्वी ४० विक्रेते सक्रिय होते. दरम्यान, गाव संघटना तयार करून अवैध दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला. त्यामुळे ३० विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला असूनही १० मुजोर विक्रेते आताही दारूविक्री करीत आहेत. कर्कापल्ली जंगल परिसरात मोहफुलाची दारू गाळली जात असल्याची माहिती मिळताच मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली, दरम्यान ४० हजार रुपये किमतीचा चार ड्रम मोहफुलाचा सडवा मिळून आला. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला.