– कारला आग लागल्याने कुटुंबातील आई वडील व तीन मुलींचा मृत्यू
The गडविश्व
राजनांदगाव : जिल्ह्यातील खैरागड मार्गावर रात्रो २ वाजताच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारला आग लागल्याने कार मध्ये असलेले एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सुभाष कोचर (६०), पत्नी कांता देवी कोचर (५८), मुलगी भावना कोचर( ३५), वृद्धी कोचर (२५), पूजा कोचर (२२) यांचा समावेश आहे.प्राप्त माहितीनुसार, खैरागड येथील सुभाष कोचर हे पत्नी व आपल्या ३ मुलींसह बालोद येथून लग्न समारंभ आटोपून खैरागड येथे परतत होते. दरम्यान परत येत असतांना सिंगापूरा येथील गणेश मंदिराजवळ कारची पुलाला जबर धडक बसली यामुळे कर पलटी झाली व काही क्षणात कार ने पेट घेतला. कार मध्ये असलेल्या कोचर कुटुंबातील ५ जणांचा यात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.अधिक तपास पोलीस करीत आहे .
अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरून गेला असून मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे.