– चंद्रपूर मार्गावरील घटना
The गडविश्व
चंद्रपूर : मूल चंद्रपूर मार्गावरील चीचपल्ली नजीक झालेल्या कार अपघातात एकाच कुटुंबातील २ महिलांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस कर्मचारी अनिल पारखी हे आपल्या कुटुंबासोबत मोठ्या भावाच्या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी चंद्रपूर येथे गेले होते. दरम्यान कार्यक्रम आटोपून चामोर्शी येथे कार ने परत जात असताना चीचपल्ली नजीक मार्गावर गुरे ढोरे आडवी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. यात भरधाव कार एमएच ३३ वि ९६८८ उलटली. यात पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी किरण पारखी (३२) , आई शोभा पारखी (६५) यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस कर्मचारी अनिल पारखी (४०), साधना पारखी (४५), राम पारखी (७), अराध्या पारखी (४), ओम (१०) व नंदिनी (१४) हे जखमी झाले. त्यांना चंद्रपूर येथे खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.