किष्टापूर (वेल) ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत आविसच्या सौ.अनुराधा अविनाश सरदार विजयी

1053

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील किष्टापूर ग्रामपंचायत मध्ये पोट निवडनूक पार पाडली आहे. यात आविसच्या सौ.अनुराधा अविनाश सरदार विजयी झाल्या आहेत.
किष्टापूर ग्राम पंचायत मध्ये ९ सदस्य च्या कोरम आहे. सार्वत्रिक निवडणुक २०२० मध्ये झाले होते त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या समर्पित ५ सदस्य निवडुन आले होते.तर आदिवासी विद्यार्थी संघाचे ४ असे एकूण ९ सदस्य होते व राष्ट्रवादी पक्षाचे सरपंच व उपसरपंच विराजमान आहेत. मात्र स्थानिक राजकारणात विरोध झाल्याने दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादीचे सदस्या सौ.सरिता मलाया तोटावार यांच्यावार नावाने अतिक्रमण असल्याच तक्रार करण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांनी त्याचे सदस्यत्व अपात्र घोषित झाले होते. त्यामुळे एका सदस्यसाठी पोट निवडणुक घेण्यात आली.
आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प सदस्य अजय नैताम यांच्या नेत्रुत्वात निवडणुका पार पाडले होते. या निवडणुकीत आविस कडून सौ.अनुराधा अविनाश सरदार सदस्य म्हणून निवडून आले आहे.
विशेष म्हणजे आता समोरच स्थानिक स्वराज संस्था ग्राम पंचायत मध्ये सत्तेच्या उलट पलट होऊ शकतो हे मात्र निश्चितच.
आज विजयी उमेदवार सौ अनुराधा सरदार यानां माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या निवासस्थानी पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी उपसभापती सौ.गीताताई चालुरकर, माजी उपसरपंच अशोक येलमूले, ग्राम पंचायत सदस्य नरेश मडावी, संतोष वसाके,पुनेश कंदीकुरवार, दलसु मडावी, जूरू आत्राम,प्रकाश दुर्गे,नरेंद्र गरगम व आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here