The गडविश्व
आरमोरी : तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कुरुंडीमाल तर्फे नरचुली येथे शाळा प्रवेश अभियान ०८ एप्रिल २०२२ रोजी शुक्रवार ला संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील रामचंद्रजी उईके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नरचुलीच्या ग्रामसेविका कु. पोटावी ह्या होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्तावित भाषणात शाळेचे मुख्याधापक बी. एस. जाधव यांनी शाळेत असलेल्या व विभागातर्फे दिल्या जाणाऱ्यां सुविधा विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेत भरती करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता हातझाडे, चिवंडे, पारधी, नैताम सर (Edu. Fellow) व पठाण यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन एस. एन. शेंडे यांनी केले व आभार एन. एच. बारसागडे यांनी मानले. कार्यक्रमाला अधिक्षिका कु. जवंजाळ , राउत, घोडाम, तितिरमारे इ. कर्मचारी उपस्थित होते. दिगंबर जी गेडाम. शशिकला गेडाम, संजय उईके, जनार्धन गेडाम, संतोष सडमाके इ. पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मिठाई देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.