-जिल्हावासीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तालुका लघू पशुचिकित्सालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या बेबीनंदा पेंदोर यांची सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पहिल्या दहामध्ये निवड झाली आहे. त्याच्या या निवडीने जिल्हावासीयांकडून अभिनंदन केले जात आहे.
बेबीनंदा पेंदोर या कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पुशुचिकित्सालयात चुतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. दररोज दैनिक वृत्तपत्र वाचनाची त्यांना आवड आहे. त्यांची सोनी टीव्ही वरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामध्ये पहिल्या दहामध्ये निवड झाली असून त्या हॉटसिटवर विराजमान होतील अशा शुभेच्छा देण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’ ची टिम कुरखेडा मध्ये दाखल झाली होती अशी माहीती आहे. अतिदुर्गम अशा गडचिरोली जिल्हयातील महिलेचा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात निवड झाल्याने सर्वच स्तरातुन त्यांचे अभिंनदन करण्यात येत आहे.