– तालुक्यातील सोनसरी येथील घटना
The गडविश्व
कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी येथील गर्भवती महिलेने घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवार ६ एप्रिल रोजी घडली. कुंदा श्रीकांत दहीकर (२७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक महिलेचे गेल्या वर्षीचा विवाह झाल्याचे कळते. पती श्रीकांत शेतकरी आहे. कुंदा हि नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास पतीसोबत फिरायला गेली होती अशी माहिती आहे. फिरून घरी परतल्यानंतर ती आपल्या बेडरूमध्ये गेली व पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. बराच वेळ होवूनही खोलीतून बाहेर न आल्याने घरच्यांना शंका आली. त्यांनी आवाज दिला मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलीस पाटील व शेजाऱ्यांच्या उपस्थितीत दरवाजा तोडण्यात आला. यावेळी ती पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. कुंदा ही दोन माहिन्यांची गर्भवती असल्याचेही कळते. घटनेची माहीती मिळताच कुरखेडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास कुरखेडा पोलीस करित आहे.