The गडविश्व
कुरखेडा, १३ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त तहसील कार्यालय कुरखेडा येथून आज १३ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा’ रॅली काढण्यात आली.
देशभरात स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येत आहे. आज १३ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय कुरखेडा येथुन तहसीलदार माडी यांच्या मार्गदर्शनात सुरुवात करण्यात आली. ‘भारत माता की जय ,’वंदे मातरम’ च्या जयघोषात ही रॅली तहसील कार्यलयापासून सुरुवात करण्यात येऊन शहरात ‘हर घर तिरंगा’ रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.