कुरखेडा नगरपंचायतीवर भाजपाने पुन्हा एकदा बाजी मारत गड राखला

301

– भाजपा ९, शिवसेना ५ तर काॅंग्रेस ३ जागेवर विजयी

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील ९ नगरपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी झाली. कुरखेडा नगरपंचायतीचा निकाल हाती लागला असून नगरपंचायतीवर भाजपाने आपला गड राखत या निवडणूकीतही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेव, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात निवडणूक लढवण्यात आली होती. यात भाजपाने ९ जागांवर विजय मिळवित पुन्हा एकदा आपला गड राखत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर शिवसेना ५ तर काॅंग्रेसला ३ जागेवर विजय मिळविता आला आहे. या नगरपंचायतीवर मागील कार्यकाळातही भाजपाची सत्ता होती तसेच याही निवडणूकीत भाजपनेच बाजी मारल्याने कार्यकत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून मोठया उत्साहात जल्लोश करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here