The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, २४ ऑक्टोबर : तालुक्यातील अनेक गावातील हलक्या धान पिकाची कापणी करून कडपा शेतात ठेवले होते मात्र परतीच्या पावसाने अनेक शेतकर्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
कुरखेडा येथील मनोहर लांजेवार यांची शेती कुरखेडा लागत असलेल्या गोठानगाव येथे असून त्यांचा शेतात असलेले धानपिकाचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता कर्ज काढून फेडायचे कसे असा प्रश्न परिवाराला पडला आहे.
कुटुंबावर भारी संकट कोसळले असून त्यात त्यांनी नुकसान भरपाई ची मागणी गेली आहे.