The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १७ सप्टेंबर : येथील सती नदी पात्रता बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. चेतन सलामे (२९) रा. मोहगाव (वाकडी) ता. कुरखेडा असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील एका महिलेचे आज शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी सती नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी चेतन सलामे हा अत्यंसंस्काराकरिता गेला होता. दरम्यान त्याचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना दिली असता मृतदेह नदी पत्रातून काढून शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्यावर उद्या सकाळी ११ वाजता मोहगाव (वाकडी) या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरलेला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.