– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
The गडविश्व
देसाईगंज : तालुक्यातील कुरुड येथे आज १४ एप्रिल २०२२ ला युगप्रवर्तक, कल्पप्रवर्तक, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती प्रीत्यर्थ स्वयं रक्तदाता समिती तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १४ जणांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान करून व्यक्तीचे प्राण वाचवण्यास मदत होत असते. हेच ध्येय पुढे ठेवत स्वयं रक्तदाता समिती जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहचत रक्तदानाविषयी योग्य ते मार्गदर्शन करीत नागरिकांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित करीत आहे. स्वयं रक्तदाता समितीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना रक्तदानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच या मार्गदर्शनातून अनेकजण प्रोसाहित होऊन रक्तदान करण्यास पुढे सरसावतांना दिसत आहेत. कुरुड येथे आज पार पडलेले रक्तदान शिबिर हे स्वयं रक्तदात समितीचे ४९ वे रक्तदान शिबीर आहे. या आजच्या शिबिरातून १४ जणांनी पुढाकार घेत रक्तदान केले. स्वयं रक्तदात समितीच्या माध्यमातून रक्तदान केल्यास रक्तदात्याचा सानुग्रह विमा तयार करण्यात येतो. रक्तदान केल्यानंतर त्या रक्तदात्याचा अपघाती निधन झाल्यास रक्तदात्यास सानुग्रह निधी देण्याची तरतूद स्वयं रक्तदात समितीमध्ये आहे.
आज पार परडलेल्या रक्तदान शिबिरामध्ये गिरीधर ठाकरे, सुरज लोथे, बादल दोनाडकर, मोहित शिपलकर, अर्पित दुमाने, पंकज घुटके, शंकर करमनकर, अतुल रामटेके, फिरोज मेश्राम, सुमेध मेश्राम, किशोर शेंडे, संतोष चौधरी, शुभम झुरे, अथर्व केळझटकर यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन केले.
बादल मेश्राम, अंकुर उके, बादल दोनाडकर, वंश वासनिक, संकेत फुले यांचे रक्तदान शिबिरात विशेष सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिरात स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम डॉ. शेडमाके, अविनाश गेडाम उपस्थित होते.