मुरूमगाव नजीकच्या ‘त्या’ अपघातात जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

760

– कूलभटी – मुरुमगाव मार्गावर ट्रक च्या धडकेने झाला होता अपघात

The गडविश्व
ता.प्र / धानोरा , १८ सप्टेंबर : तालुक्यातील मुरुमगाव ते कूलभटी मार्गावर १४ सप्टेंबर रोजी ट्रक ने धडक देऊन झालेल्या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या रवींद्र नरोटेचा गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १६ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मुरुमगाव पासून ८ की.मी.अंतरावर असलेल्या कूलभटी येथील मुख्य मार्गावर १४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४:३० वाजता कूलभटी येथील रविंद्र नरोटे हे दुचाकीने मुरुमगाव ला जात असतांना मुरुमगाव वरून सावरगाव कडे भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात ट्रक ने त्यांना धडक दिली यात रविंद्र नरोटे गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. अपघातात त्यांच्या डोक्याला, हाथाला तसेच पायाला गंभीर जखम झाली होती. अपघाताची माहिती सावरगाव पोलीसांना मिळाली असता लागलीच नाकाबंदी करून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ला ताब्यात घेतले व अपघातात जखमी झालेल्या नरोटे ला प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव येथे दाखल केले असता प्राथमिक उपचार करून ग्रामिण रूग्णालय धानोरा येथे रेफर केले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र १६ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ज्या दुचाकी वाहनाने मृतक रविंद्र नरोटे यांचा अपघात झाला ते वाहन मुरुमगाव येथील एका सायकल स्टोअर दुकानदार निम॔ल निरंजन बिसवास यांच्या मालकीची असल्याचे कळते तसेच त्या दुचाकी वाहनाला नंबर प्लेट सुद्धा नव्ह्ती हे विशेष. त्यामुळे दूचाकी वाहन चोरीची तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे. सदर घटनेचा तपास पोलीस मदत केन्द्र सावरगाव चे पोलीस प्रभारी अधिकारी पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here