The गडविश्व
गडचिरोली : कृषि महाविद्यालय, सोनापूर-गडचिरोली येथे १ दिवसीय कुक्कूटपालन व्यवसाय व्यवस्थापन व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान या विषयाची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे संयुक्तरित्या उद्घाटन अप्पर पोलीस अधिक्षक, गडचिरोली समीर शेख यांचे हस्ते तथा सहायक आयुक्त, पशुसंवर्धन कार्यालय गडचिरोली डॉ. संजय थोटे,कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र गडचिरोली डॉ. संदिप कन्हाडे, यांचे प्रमुख उपस्थितीत सहयोगी अधिष्ठाता,कृषि महाविद्यालय, सोनापूर- गडचिरोली डॉ. प्रकाश कडू, सहयोगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रशिक्षणामध्ये भामरागड, धानोरा, चामोर्शी, वडसा या भागातून आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रशिक्षण भारतीय अनुसंथान परीषद नवी दिल्ली यांचे आदिवासी उपयोजना अंतर्गत घेण्यात आले असून त्यामध्ये कुक्कूटपालन व्यवसायाविषयी संपुर्ण मार्गदर्शन कोंबड्यांच्या जाती, लसीकरण, खाद्य या बाबींवर तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांना मदत म्हणुन कोंबडीचे पिल्ले, खाद्य तसेच इतर सामुग्रीचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकांच्या लागवडी संदर्भात तज्ञांनी मार्गदर्शन केले व महाबीजचे विविध भाजिपाल्यांचे बियाणे शेतकरी बंधुना वितरण करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक,गडचिरोली डॉ. समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना या विषयावर मार्गदर्शनाचा व निवीष्ठेचा लाभ दिल्याबद्दल या प्रकल्पाची प्रशंसा केली व या मार्गदर्शाने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्यक्ष कार्य करून आपले जिवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगीतले. डॉ. संजय घोटे यांनी दुग्ध व्यवसाय व कुक्कूटपालन विषयी जागृकता निर्माण करण्याचे दृष्टिने या व्यवसायातील बारकाव्यासंबंधी मार्गदर्शन प्रशिक्षाणा दरम्यान केले. या कार्यक्रमात तज्ञ म्हणुन डॉ. धोटे, डॉ. डी.टी. उद्रंटवाड, डॉ. वाय. आर. खोब्रागडे, डॉ. कदम यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. ए.एस. टिंगरे, सहयोगी प्राध्यापक, डॉ. डी.टी. उद्भटवाड, सहायक प्राध्यापक यांनी केले.