The गडविश्व
गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत स्थानिक सोनापूर येथील कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांअंतर्गत शहरातील रिद्धी-सिद्धी राईस मिलला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली.
यावेळी राईस मिलचे व्यवस्थापक महेश कुकडे यांनी धानाचे तांदळात रूपांतर होण्याची प्रक्रिया, मिलमधील यंत्रणा, कामगार व पुरवठा व्यवस्था कशाप्रकारे कार्य करते आदींची माहिती विद्यार्थिनींना दिली. या उपक्रमात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, उपक्रम अधिकारी डॉ. प्रवीण महातळे, मार्गदर्शक नरेश बुद्धेवार, विषयतज्ञ डॉ. शुभांगी अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली योगिनी वरखडे, ज्ञानेश्वरी बडगे, धनश्री प्रधान व दिव्या अतकरी या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.