केमिकल फॅक्ट्रीमध्ये भीषण आग : ६ जणांचा मृत्यू, ११ जखमी

500

– जखमींना रुग्णालयात केले दाखल, रात्रोच्या सुमारास आग लागल्याने उडाली तारांबळ

The गडविश्व
हैदराबाद : आंध्रप्रदेशातील वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेममध्ये काल बुधवारी रात्रोच्या सुमारास केमिकल मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये भीषण आग लागली. या आगीत ६ जणांचा मृत्यू तर ११ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना विजयवाडा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
केमिकल फॅक्ट्रीतील दोन मजले आगीच्या भक्ष्यस्थानी आले. येथे १७ कर्मचारी काम करत होते. या आगीच्या घटनेत मृत्यू झालेले अधिकतर लोक बिहारचे असल्याची माहिती आहे. हे सर्व जण वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील पोरस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नाइट शिफ्टमध्ये काम करत होते. या फॅक्ट्रीमध्ये पॉलिमर बनवण्याचे काम केले जाते. आगीच्या कारणाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु ही घटना गॅस पाइप तुटल्याने किंवा गळती झाल्याने होऊ शकते असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. आग लागल्यानंतर काही तासांनी आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून ११ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here