The गडविश्व
गडविश्व : आम आदमी पार्टीने देशात आपली पाळेमुळे पसरविण्यास सुरवात केली असून दिल्ली पासून आता गल्ली पर्यंत आपला ठसा उमटविण्याची जोरदार तयार सुरू केली आहे. या पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणूकीत घवघवीत यश प्राप्त करून सत्ता काबीज केली. एवढेच नव्हे तर गोवा विधान सभेत सुध्दा या पक्षाने एन्ट्री केली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचे मनोबल वाढले असून कार्यकर्त्यांमध्ये सुध्दा उर्जा निर्माण झाली आहे. नुकतीच आम आदमी पार्टीची बैठक पक्षाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी विदर्भ कमेटीच्या सुचनेनुसार आम आदमी पार्टीच्या गडचिरोली शहर प्रमुखपदी सामाजिक कार्यकर्ते कैलाश शर्मा यांची निवड करण्यात आली. शर्मा हे सामाजिक कार्यात सक्रीय असून ते पक्ष वाढीबरोबरच सर्वसामान्यांच्या समस्या सोडवून आपल्या पदाला न्याय देतील, अशी अपेक्षा आप चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
तसेच बैठकीत गडचिरोली जिल्हयात होणाऱ्या नगर परिषद निवडणूका ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाच्या जिल्हा कमेटीने घेतला असून याबाबतचा प्रस्ताव विदर्भ कमेटीला पाठविला आहे.
बैठकीला जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, महामंत्री भास्कर इंगळे, सोनल न्ननावरे, समिता गेडाम, अलका गजबे, कोशाध्यक्ष संजय जिवतोडे , संघटन मंत्री देवेंद्र मूनघाटे, नवनियुक्त शहर प्रमुख कैलास शर्मा, गणेश त्रिमुखे, मिडीया प्रमुख नामदेव पोले, हितेंद्र गेडाम, रुपेश सावसाकडे, अनिल बाळेकरमकर, चेतन येनगटींवार, सावन सावसाकडे, साईनाथ नैताम, अनूरथ निलेकर, ओमप्रकाश कात्रोजवार, अक्षय ताटलावार, कार्तिक राऊत, विकास पेंदाम,इत्यादी कार्यकर्ता उपस्थित होते.