The गडविश्व
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे पोलिस व मुक्तिपथने गुरुवारी संयुक्त कारवाई करीत ३२ हजार ८०० रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
होळीच्या सणानिमित्त गावात अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी कोंढाळा येथील दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकली. यावेळी सहा दारूविक्रेत्यांच्या घरी देशी व मोहाची दारू आढळून आली. पोलिसांनी एकूण ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गावातील सहा दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिस पाटील कुंभलवार, सरपंच राऊत, रामटेके, मुक्तिपथ तालुका संघटक भारती उपाध्ये, तालुका प्रेरक अनुप नंदगिरवार आदी उपस्थित होते.