The गडविश्व
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली येथील एका दारूविक्रेत्याकडून ९ हजार ९६० रुपयांची देशी दारू जप्त करीत त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची कारवाई मुलचेरा पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या सोमवारी केली. दिलीप हिवराज बिसेन असे आरोपीचे नाव आहे.
कोपरअल्ली येथे गाव संघटन महिलांच्या अथक प्रयत्नाने अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, गावातील जवळपास ९ दारूविक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने आपला अवैध व्यवसाय सुरु केला आहे. प्राप्त माहितीच्या आधारे मुलचेरा पोलिसांनी दिलीप बिसेन याच्या घराची तपासणी केली असता, ९ हजार ९६० रुपये किंमतीचे देशी दारूच्या १६६ निपा मिळून आल्या. संपूर्ण माल जप्त करीत दारूविक्रेत्यावर मुलचेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई प्रभारी अधिकारी अशोक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कड, पोलिस शिपाई रोशन पोहनकर, चरणदास गाईन, पल्लवी लाडे यांनी केली. यावेळी मुक्तिपथचे तालुका संघटक रुपेश अंबादे उपस्थित होते.