कोरची येथे गरोदर मातेचा मृत्यू : बाळाचाही पोटातच मृत्यू

685

– तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील शेवटच्या टोकावर असलेल्या छत्तीसगड सिमेलगत असलेल्या कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना काल २० जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या महिलेसह पोटातील बाळाचाही पोटातच मृत्यू झाला आहे यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रमशीला सुनील किरंगे (२१) असे मृतक गरोदर मातेचे नाव आहे.
१०० टक्के प्रसुती रूग्णालयात व्हावी याकरिता गरोदर मातांना प्रसुतीसाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले जाते. मात्र वेळेवर उपचार न मिळणे व गरोदरपणाीतल आजारामुळे माता मृत्यू होण्याचा सिलसिला कामय आहे.
कोरची तालुक्यातील भर्रीटोला येथील रहिवासी असलेली रमशीला(२१) हिचे दोन वर्षापूवी कुरखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथील सुनील किरंगे यांच्याशि लग्न झाले. सदर महिला गरोदर असल्यामुळे व प्रकृती बरी नसल्याने आपल्या माहेरी भर्रीटोला येथे आली होती. अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला उपचाराकरिता कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात दुपारी १२ वाजताच्या सुमारास भरती करण्यात आले. दरम्यान सदर महिलेची तपासणी केली असता तिचा रक्तदाब वाढलेला होता. हिमोग्लोबीन ६ ग्रॅम होता अशी माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष विटणकर यांनी दिली. आठवा महिना सुरू असलेल्या महिलेचे बाळ पोटातच दगावले होते व प्रकृती खालावत असलेल्या रमशीलाचा सुध्दा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. विटणकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here