कोरेगांव धान खरेदी केंद्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते शुभारंभ

190

The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, १ नोव्हेंबर : राष्ट्रसंत अभिनव सेवा सहकारी मर्या चे धान खरेदी केंद्राचे शुभारंभ आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी धान खरेदी ही दरवर्षीपेक्षा यावर्षी एक महिना पूर्वीच धान खरेदीचे आदेश आल्याने शेतकऱ्यांनी सरळ व कोणतेही घाई न करता आपल्या धानाची विक्री शासकीय खरेदी मार्फतच करावे असे शेतकऱ्यांना आवाहन केले. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी मार्केटिंग अधिकारी तिवाडे, चोपचे माजी सरपंच वामन शहारे, कोरेगावचे उप सरपंच अनिल मस्के, धनंजय तिरपुडे, अरुण राजगिरे, अक्कलपूरचे माजी सरपंच विजू सहारे, माजी सरपंच आत्माराम सूर्यवंशी, बोडदा येथील पुरुषोत्तम गायकवाड, अरुण गायकवाड, शिवा गायकवाड, विसोरा येथील गबने, राष्ट्रसंत अभिनव सेवा सहकारी खरेदीचे सचिव दिनेश कुर्जेकर, चित्तरंजन नाकाडे, मदन बनपुरकर, राकेश टिकले व खरेदी-विक्री सेवा कर्मचारी वर्ग व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here