– लसीकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
The गडविश्व
नवी दिल्ली : देशात कोरोनाची लाट धोक्याच्या पातळीवर अतसानाच आता लसीकरणासंदर्बातील मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरून काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
कोरोनाची लस घेणे हे कुणालाही बंधनकारक करता येणार नाही, तर हा मुद्दा पूर्णपणे ऐच्छिक असेल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
देशात सध्या सुरु असणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत महत्त्वाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
एका संस्थेने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले. दरम्यान, आपण लसीकरण करताना कोणत्याही प्रकारची सक्ती केली नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने न्यायालयाला दिले आहे. कोणत्याही व्यक्तीच्या परवानगी आणि इच्छेशिवाय लसीकरण केले जाणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केलेले आहे.