– सी.ई.ओ. कुमार आशीर्वाद यांचे जनतेला आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : सध्या सार्वत्रिक कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लस घेणे, मास्कचा नियमित वापर करणे, हात सॅनिटाईज करणे, गर्दीमध्ये न जाणे या महत्वाच्या उपायासोबतच तंबाखू, खर्रा न खाणे व दारू न पिणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे कोरोना नको, खर्रा नको, दारू नको, असे आवाहन जि.प. चे सीईओ कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
खर्रा, तंबाखू खाऊन थुंकतो आणि त्या थुंकीतून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. पानठेल्यावर कोरोनाची लागण झाली तर त्या खर्रासोबत कोरोना सुद्धा घरी येऊ शकतो. दारू पिण्यासाठी बार मध्ये किंवा भट्टीत गेल्यावर त्या ठिकाणाहून सुद्धा कोरोना विषाणू घरी येऊ शकतो. त्यामुळे कुटुंब धोक्यात येउ शकते. या अगोदरच्या कोरोना लाटेमधे मागील वर्षी यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात अशा पद्धतीने खर्रा शौकिनाद्वारे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणूनच कोरोना पासून वाचण्यासाठी शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करा यासोबतच खर्रा दारू व सर्व तंबाखू पदार्थाला नाही म्हणा असे आवाहन जि.प. सीईओ कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.